वणीत दुसरे कोविड सेन्टर कधि सुरु होणार ?एसडिओंच्या दालनात तातडीची बैठक घेऊन आमदार व नगराध्यक्षांनी दिले होते निर्देश

102

 

वणी : परशुराम पोटे

वणी शहरात कोरोनाचे पेशन्ट दिवसागणीक वाढतच चालले आहे. पहाता पहाता रुग्णांची एकुन संख्या ६२ वर पोहचली आहे. तर येथिल परसोडा कोविड सेन्टर मध्ये सुविधांचा अभाव असल्याची वारंवार तक्रारी येत आहे. ईत्यादी समस्यांचे निराकर करण्याकरिता वणी विधान सभेचे लोकप्रिय आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार व वणीचे नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांनी दि.२६ जुलै रविवारी दुपारी एसडिओंच्या दालनात तातडीची बेठक घेतली. या बैठकीत उपविभागीय अधिकारी डाँ.शरद जावळे,आरएच चे प्रमुख मुख्यधिकारी संदिप बोरकर,पिओसी चे प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कोरोना पेशन्टच्या वाढत्या प्रभावानुसार परसोडा कोविड सेन्टरच्या सुविधा उत्तम व्हाव्या, स्वच्छतेच्या बाबतीत काळजी घ्यावी,तसेच कन्टेमेंट झोन कडे लक्ष द्यावे,जनेकरुन वणी शहरात कोरोनाचे पेशन्ट वाढणार नाही. कारण यवतमाळ, दारव्हा,नेर व पांढरकवडा या ठिकाणी कडकडीत जनता कर्फु लावण्यात आला आहे. ती परिस्थिती वणी शहरावर येवु नये, अशा सुचना आमदार बोदकुरवार यांनी यावेळी केल्या होत्या.तसेत यावेळी नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे म्हणाले होते की,वणीकरांच्या मागणी नुसार कोविड सेन्टर मध्येच कोरोनाची चाचणी सुरु झाली अाहे. तसेच कोरेन्टाइन सेन्टर दुसरे असायला पाहिजे या मागणीला घेवुन आमदारांनी बैठकीत चर्चा केली.त्यानुसार वणीत दुसरे कोविड सेन्टर सुरु होणार असुन याबाबत वणी शहरा बाहेरील शाळांची पाहणी करुन योग्य शाळेची निवड करण्यात येणार आहे असेही ते यावेळी म्हणाले होते. तसेच याकरिता नगर परिषेदे मार्फत चार कर्मचारी देण्यात येणार असल्याचेही नगराध्यक्षांनी सांगीतले होते. परंतु ‘मांजर’ आडव कुठ आलं, २० दिवस लोटुन गेले परंतु दुसरे कोवीड सेंटर सुरु करण्यात आले नाही.परिणामी दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढतच चालली असल्यामुळे दुसरे कोविड सेंटर कधि सुरु होणार?अशी चर्चा रंगु लागली आहे.