Home चंद्रपूर  अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसा निमित्त शैक्षनीक साहित्य वाटप व वृक्षारोपण

अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसा निमित्त शैक्षनीक साहित्य वाटप व वृक्षारोपण

200

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक
चंद्रपुर:- दिल्ली राज्यात शैक्षनिक क्रांती घडवणारे शिक्षण स्वास्थ, स्वस्त विज, मुफ्त पाणी यासारख्या मुलभुत मुद्द्यावर दिल्ली जिंकणारे अाम अादमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री मा. अरविंद केजरीवाल यांना वाढदिवसा निमीत्त अाज दि. 16 अाॅगस्टला नेहरु नगर येथे महानगर उपाध्यक्ष योगेश अापटे यांच्या नेतृत्वात वृक्षारोपण व शैक्षनिक साहित्य वाटप करण्यात अाले. अाम अादमी पार्टी माहानगर तर्फे अापचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दिल्लीचे मुख्यमंत्री श्री. अरविंद केजरीवाल यांचा वाढदिवसा निमित्त “नेहरु नगर” येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात अाले तर वार्डातील गरजु विद्यार्थांना नोट बुक व पेन वाटप करण्यात अाले. यावेळी अाप शहर महानगर उपाध्यक्ष योगेश अापटे, कोषाध्यक्ष सिकंदर सागोरे, सोशल मीडीया प्रमुख राजेश चेड्डगुलवार, गिरीश राउत,भास्कर शेंडे अजय उईके, प्रविण धारणे, सुरज बुरडकर, सचिन ठक, प्रविण सोमलकर तसेच नेहरु नगर मित्रमंडळाचे पदाधिकारी महेश गौरकार, रमेश बोबडे,शफीखान पठान, दिलीप गोहने, सचिन करंडे, गजानन बावने, उईके मामा, गणेश शेंडे. अनुराग पिंपळकर, अमन शेडे. अादींची उतस्थिती होती.

Previous articleजीवघेणे खड्यांवर भ्रष्टाचार विरोधी समिती कोरचीचा बेशरमचे झाडे लावा आंदोलन
Next articleवणीत दुसरे कोविड सेन्टर कधि सुरु होणार ?एसडिओंच्या दालनात तातडीची बैठक घेऊन आमदार व नगराध्यक्षांनी दिले होते निर्देश