परसोडा कोविड सेन्टरवर सोयसुविधांचा बोजवारा, जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या होम कारंटाइन बाबत आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करा – गित घोष

103

 

वणी : परशुराम पोटे

परसोडा तालुका कोविड सेन्टर मध्ये सोयसुविधेचा अभाव असुन तसेच पाँझिटिव्हसह संपर्कात आलेल्या व्यक्तींना एकाच ठिकाणी क्वारंटाइन करण्यात येत असल्यामुळे क्वारंटाइन व्यक्तीना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.नागरीकांचा त्रास दुरकरण्यासाठी होम क्वारंटाइन बाबत जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करा अशा आशयाचे निवेदन अखिल भारतिय संवैधानिक हक्क परिषदेचे अध्यक्ष गित घोष यांनी दि.१२ आँगष्ट्ला उपविभागीय अधिकारी वणी यांचे मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना दिले आहे.
वणी तालुक्यात कोविड – १९ चे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. वणी शहरात प्रथम कोरोनाचे रुग्ण वाढले. आता ग्रामिण भागातही कोरोना पोहचला आहे.परिणामी शासन संशयीत म्हणुन किंवा पाँझिटिव्ह रुग्णांच्या जवळच्या व्यक्तींना तालुका कोविड सेन्टर असलेल्या परसोडा येथे क्वारंटाइन करतात.व त्यांचे स्वँब घेऊन त्यांचा तपासणी अहवाल पाँझिटीव्ह आला की,त्यांना परसोडा येथे ठेऊन त्यांचा ईलाज त्या ठिकाणी केला जात आहे.तर त्यांच्या संपर्कात आलेल्यांना त्याच ठिकाणी क्वारंटाइन ठेवल्या जात आहे.या कोविड सेन्टर मध्ये रुग्णांकरिता लागणार्या आवश्यक सुविधांचा अभाव आहे.त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.या गैरसोयीचा रुग्णांना अतिषय त्रास सहन करावा लागत आहे.सद्या पावसाळा सुरु आहे.या वातावरणात दरवर्षी जनतेला ताप, शर्दी, खोकला व हगवन यासारख्या साथिच्या रोगाची लागन होत असते.अशा साथिच्या रुग्णांना त्या ठिकाणी क्वारंटाइन ठेवण्यात आल्यास त्यांच्यावर या साथिच्या आजाराचा कोणताही इलाज केल्या जात नाही.सदर आजारावर इलाज न झाल्याने त्यांचा आजार बळावला जात आहे.परिणामी त्यांच्या जिवीताला धोका निर्माण होत आहे.तसेच ज्या रुग्णांना परसोडा केन्द्रावर नेल्या जात आहे. त्यांच्यावर गावात सामाजिक बहिष्कार टाकण्यात येत आहे.काहि कुटुंबातील सर्व सदस्यांना क्वारंटाइन केल्यामुळे त्यांच्या शेतीकडे व जनावरांच्या चारापाण्याची गैरसोय होत असल्यामुळे जनावरे म्रुत्युमुखी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच मजुरांना काम न मिळाल्यामुळे त्यांच्यावरसुद्धा उपासमारीची पाळी आली आहे.तसेच सामाजीक बहिष्कारामुळे त्यांची मानसिकस्थिती सुद्धा बिगडत असल्याने अशा स्थितीत ते आत्महत्या सुद्धा करु शकतात अशी भयावहस्थिती ग्रामिण भागात निर्माण झाली आहे.क्वारंटाइन केलेल्या रुग्णांना त्यांची प्रतिकार शक्ती वाढविण्याच्या द्रुष्टीने कोनताही इलाज केन्द्रावर केल्या जात नाही.फक्त दोन वेळेचे जेवन घेण्यासाठी त्यांना तेथे ठेवल्या जात आहे. या निवेदनात असेही म्हटले आहे की,त्या रुग्णांना जेवणापुरतेच कोविड सेन्टरला ठेवायचे असेल तर त्यांना त्यांच्या गावातील होम क्वारंटाइनची व्यवस्था असेलतर त्यांना त्यांच्या घरी किंवा गावातील शाळा,समाज मंदीर किंवा शासकीय इमारतीत ठेवण्यात येऊन तेथेच त्यांची रँपिड टेस्ट करण्यात यावी,जेनेकरुन नागरीकांचा त्रास वाचेल व त्यांना घरुन आवश्यक ती मदत उपलब्द होईल व रुग्ण लवकर बरा होवुन घरी जातील.

घोन्सा येथिल दुकाने ७ दिवस बंद राहणार

मौजा घोन्सा येथिल दुकाने येत्या ७ दिवसाकरिता बंद ठेवण्यात यावे,असे घोषित करण्यात आले आहे.त्यामुळे ग्रामिण जनते करिता पोळा सनानिमीत्य लागणारा किराणा व धान्य मिळणार नाही.परिणामी परिसरातील जनतेला अतोनात त्रास सहन करावा लागेल.त्यामुळे गावामध्ये अशांतता निर्माण होऊन प्रशासनाविरोधात असंतोष व गैरसमज निर्माण होईल.लोकांची होणारी हि अडचन व गैरसोय टाळण्याकरिता जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार ज्यांच्याकडे व्यवस्था असेल त्यांना त्यांच्या घरी किंवा स्थानिक पातळीवरच क्वारंटाईन करण्याची व्यवस्था केल्यास जनतेचा त्रास कमी होईल,असे निवेदनात म्हटले आहे.