खिरपाणी डोहात बुडालेल्या ‘त्या’दोन युवकांचे मृतदेह सापडले, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

148

अमरावती(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
अंजनगाव तालुक्याच्या सिमेवर असलेल्या गरजदरी खिरपाणी येथील धरणाच्या डोहात दि 14 ऑगस्टला कापुसतळणी येथील पाच युवक पोहायला गेले होते त्यापैकी आकाश साहेबराव तायडे वय 25 वर्ष व निलेश रामराव तायडे वय 26 वर्ष हे दोघेजण धरणातील पाण्याच्या डोहात बुडाले होते घटनेच्या दिवशी रात्र झाल्याने शोधकार्य होऊ शकले नाही
काल दि 15 ऑगस्टला त्या दोन युवकांचे मृतदेह सापडले दोघांचेही शवविच्छेदन करुन त्यांचे मृतदेह कुटुंबियाच्या स्वाधिन करण्यात आले अत्यंत शोकाकूल वातावरणात दोघांवर कापूसतळणी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले