जेनेरिक औषधे जनतेसाठी फायदेशीर- माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील.

0
114

 

इंदापूर तालुका प्रतिनिधी, दि.16 बाळासाहेब सुतार.

जेनेरिक औषधे स्वस्त असल्याने जनतेसाठी फायदेशीर आहेत. इंदापूर शहरात जेनेरिक औषधे उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्य जनतेची चांगली सोय झाली आहे, असे मत भाजपचे नेते व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

इंदापूर शहरात कालठण नं.2 रस्त्यावरती राऊत हाइट्स मध्ये हिंदवी जेनेरिक मेडिसिन स्टोअर्सचे उद्घाटन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते रविवारी (दि.16) करण्यात आले. यावेळी डॉ.अविनाश पानबुडे, कृष्णाजी यादव, मंगेश पाटील, गोरख शिंदे, महेंद्र रेडके, संजय बोडके, चांगदेव घोगरे, कैलास कदम, वर्धमान बोडके, प्रतिक घोगरे आदी मान्यवरांसह सुरवड, आनंदनगर येथील पदाधिकारी, कार्यकर्ते व उपस्थित होते. जेनेरिक औषधामध्ये ब्रॅण्डेड औषधासारखेच समान घटक,गुणवत्ता व सुरक्षा आहे,अशी माहिती मेडिसिन स्टोअर्सचे चालक समाधान शेळमकर यांनी दिली. यावेळी उपस्थितांचे स्वागत नीरा-भीमा कारखान्याचे संचालक दादासाहेब घोगरे, सागर शेळमकर, दीपक घोगरे, रावसाहेब घोगरे यांनी केले.

_______________________

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160