इंटरनेट च्या असुविधेमुळे ग्राहकांची गैरसोय झाल्यास मनसेने टपाल कार्यालयाला दिला आंदोलनाचा इशारा

117

 

प्रतिनिधी / प्रसाद गांधी.

चिपळूण :- देशात डिजिटल इंडियाचा वारं वाहत असताना ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्शनच्या अभावामुळे होणाऱ्या गैरसोयीवर मनसेने तीव्र नाराजी व्यक्त करत
इंटरनेट च्या असुविधेमुळे ग्राहकांची गैरसोय झाल्यास मनसेने टपाल कार्यालयाला दिला आंदोलनाचा इशारा देण्यात आला वाकवली येथील टपाल कार्यालयात येणारे पेन्शनर्स तसेच इतर खातेदारांना टपाल कार्यालयातून इंटरनेट कनेक्शन नसल्याचे कारण सांगून वारंवार फेऱ्या मारायला लावतात ही तक्रार अनेकांनी मनसेच्या तालुका सचिव मयुर काते, मिलिंद गोरिवले,अमोल काते यांना सांगितली मनसेच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ वाकवली येथील टपाल कार्यालयात भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला. कोरोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेऊन फिजिकल डिस्टंसिंग पाळून निवेदन देण्यात आले. निवेदन देताना मनसेचे दापोली तालुका सचिव मयुर काते, मिलिंद गोरिवले,अमोल काते,मयुर नाचरे उपस्थित होते.

*दखल न्यूज भारत*