फिट इंडिया अंतर्गत फ्रीडम रन आयोजन

104

 

प्रतिनिधी/अतित डोंगरे दखल न्यूज

तिरोडा:- नेहरू युवा केंद्र गोंदिया मार्फत शिवाजी युवा मंडळ सीतेपार येथील युवकांनी फिट इंडिया फ्रीडम रन स्पर्धेचे आयोजन दि. १६/०८/२०२० ला सीतेपार ते किसनपूर रोड येथे केले होते.

नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा समन्वयक कु.श्रुती डोंगरे तसेच स्वयंसेवक महेश कनपटे यांचे मार्गदर्शन, सूचनेनुसार हा कार्यक्रम घेण्यात आला.

फ्रीडमरन मध्ये ४ युवा मंडळ सदस्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत युवा मंडळ अध्यक्ष मयूर बघेले, रवी बघेले, मयूर मेश्राम,मनोज बघेले यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.