सात महिने लोटले तरी अपंगांना नाही मिळाले प्रमाणपत्र शासकीय यंत्रणेचा ढिसाळ कारभार

154

अशोक खंडारे उपसंपादक
आष्टी परीसरातील अपंगांना सात महिन्याचा कालावधी लोटला तरीसुध्दा अपंग प्रमाणपत्र देण्यात आले नाहीत. त्यामुळे शासकीय यंत्रणेचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला असल्याचे दिसून येत आहे.
शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग, अपंगांना करीता शिबिर ११ जानेवारी २०२० ला आरोग्य तपासणी , उपचार व प्रमाणपत्र वितरण या संदर्भात घेन्यात आले होते. त्या शिबिरात परीसरातील बहुसंख्य अपंग व्यक्तींनी आपली तपासणी करून घेतली काही अंपगांकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र नव्हते त्यांची सर्वप्रथम योग्य तपासणी करण्यात आली आणि त्यांना टोकन देण्यात आले व सांगितले की एका महिन्यात आपल्या पत्यावर प्रमाणपत्र पाठवले जातिल परंतु आता सात महिने पुर्ण झाले तरीही शासन लक्ष देत नाहीत. व जिल्हा शल्य चिकित्सक हे सुद्धा दुर्लक्ष करीत आहेत.
मा.जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी या संदर्भात त्वरीत चौकशी करून अपंगांना न्याय ध्यावा. जेनेकरुन अपंगांना शासनाने सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सुकर होईल