तालुका प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी
8275553131
सिंदेवाही : बहुजन विध्यार्थी संघटना तालुका सिंदेवाहीच्या वतीने गरीब ,गरजू व पित्रूछत्र हरविलेल्या सिंदेवाही शहराजवलील रेल्वे स्थानक परीसरातील पित्रूछत्र हरविलेल्या एका गरीब ,गरजू व होतकरू विद्यार्थीनिस शालेय पाठ्यपुस्तक संच व नोटबुकसचे वितरण करुन शैक्षणिक मदत करन्यात आली .
सिंदेवाही मधिल लोनवाही परिसरातील कुमारी श्रुती वसंत भडके ही विध्यार्थीनि दहाव्या इयत्तामध्ये नागपूर येथील निवासी शाळा व वसतिगृहात शिकत आहे .तिची आई रोजंदारीवर कामास असून कोरोना लाकडाऊनमुळे श्रुतीचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे बहुजन विध्यार्थी संघटना सिंदेवाहीच्या निदर्शनास आले .
त्यामुळे श्रुतीचे शैक्षणीक नुकसान भरुन निघावे व अभ्यासात गती यावी,या ऊद्देश्याने संघटनेच्या वतीने तिला दहावीचा सम्पूर्ण पाठ्यपुस्तक संच व शालेय नोटबुक्स देऊन एक शैक्षणिक मदतीचा हात पुढे करन्यात आला .
सदर शैक्षणिक कार्यात बहुजन विध्यार्थी संघटना सिंदेवाहीचे तालुका अध्यक्ष इंजि.सचिन शेंडे ,बामसेफचे प्रा .भारत मेश्राम व अध्यापक विलास तेम्भूर्णे आदींनी मोलाचे सहकार्य केले .
बहुजन विद्यार्थी संघटनाच्या माध्यमातून यापूर्वीही 10 वि /12 वि च्या विद्यार्थीसाठी इंग्रजी -गणित मार्गदर्शन केंद्राची सुविधा ,स्पर्धा परीक्षा अभ्यासिकाची उपलब्धी ,आय.टी .आय .विध्यार्थी समस्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधने ,शासकीय वसतीग्रुह विध्यार्थी प्रवेश मिळवून देणे ,गुणवंत विध्यार्थी सत्कार करणे तसेच नवोदय /शिष्यव्रुत्ती परीक्षा पूर्व मार्गदर्शन केंद्र संचालित करणे आदी विध्यार्थी हिताचे शैक्षणिक नि सामाजिक कार्य तडीस नेललेे आहे विशेष !
____________________