सोलापूर जिल्हा प्रतिनिधी // गुरूप्रसाद कुलकर्णी
मोहोळ तालूक्यातील टाकळी सिकंदर येथे भिमा सहकारी साखरकारखान्याच्या
सिझन २०२०-२०२१ हंगामाचा ‘मिल रोलर,चे पुजन आज सकाळी ९ वा.माजी खाजदार तसेच चेअरमन धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सतिश जगताप ,कार्यकारी संचालक सुर्यकांत शिंदे तसेच संचालक मंडळ ,खाते प्रमुख उपस्थीत होते.
यावेळी महाडिक म्हणाले कि,मागील तीन- चार वर्ष दुष्काळ सद्रूष्यपरिस्थी असल्याने कारखाना पूर्ण क्षमतेने चालू शकला नाही त्याचा परिणाम म्हणून आर्थिक आडचणिला सामोरे जावे लागले.परंन्तू चालू सिंझन २०२०-२०२१ मध्ये उत्तम पाऊस झाला असून कारखाना कार्यक्षेत्रात उत्तम प्रतिचा दर्जेदार ऊस उपल्ब्ध आहे. या संपूर्ण ऊसाचे गाळप करण्याची तयारी आमच्याप्रशाने केली आहे,तसेच मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीससह मंत्रीमंडळाने कारखानादारी टिकावी म्हणून कारखाना थकहंमी देण्याचा ऐतिहसिक निर्णय घेतला असल्याचे यावेळी महाडिक म्हणाले तसेच त्यांनी हा निर्णय म्हणजे महाराष्ट्रातील साखरकारखनदारी साठी ‘संजिवनी, असल्यांचे महाडिक म्हणाले तसेच या शासन निर्णयामुळे महाराष्टातील अतिविवेचनीत असलेली साखरकारखानदारी संकटातून बाहेर येणार आहे.त्यामुळे याप्रसंगी त्यांनी स्वःत्ताह सर्वाचेवतीने सरकारचे आभार मानले.
यावेळी पुढे महाडिक म्हणाले कि,सिझन २०२०-२०२१ मध्ये आम्ही १० लाख कार्यक्षेत्रातील ऊस गाळपाचे उध्दीष्ट ठेवले आहे व विजनिर्मितीचे ८ कोटी युनिटचे उध्दीष्ट ठेवले आहे .त्यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकर्याच्या संपूर्ण् ऊसाचे गाळप होणार आहे .त्यामुळे भिमाच्या सभासदानी इतर कोणत्याही कारखान्यास ऊस गाळपास देऊ नये असे अवाहन त्यांनी या वेळी केले.
ते मागील सिझन मधील शेतकरी व कामगारांच्या थकित ऊस बिल व वेतना विषयी बोलताना म्हणाले कि, ‘मागील सिझन मधिल शेतकर्यांच्या गाळपास आलेल्या ऊसाचे उर्वरीत देय्य बिल व कामगारांचे थकित वेतन लवकारात लवकर देण्यात येईल असे महाडिक म्हणाले.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, मुख्य शेती अधिकारी पाटील, व्हा चेअरमन सतीश अण्णा जगताप,भीमा परिवाराचे संघटक मा. प्राध्यापक संग्राम चव्हाण सर, कारखान्याचे संचालक बापुसो चव्हाण,बिभिषण वाघ,तुषार चव्हाण,अनिल गवळी,चंद्रसेन जाधव,रामहरी रणदिवे,बापु गवळी,गणपत पुदे,सिद्राम मदने,तसेच संजय यादव,चिफ इंजिनियर आसबे,ओ.एस.भाऊसाहेब जगताप, माणिक बाबर सर्व संचालक मंडळ, भीमा परिवारातील सर्व पदाधिकारी व अधिकारी कामगार वर्ग सभासद यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.