विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन विद्यार्थ्यांविना साजरा

188

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत

आरमोरी:- कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर यंदाच्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाला लॉक डाऊन नियमावली बंधनकारक असल्याने यावर्षी जवाहरलाल नेहरू विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय जोगीसाखरा येथे महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून विद्यार्थ्यां वीना ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. ध्वजारोहन पूजा किशन मोटवानी सदस्य गुरुनानक सोशालिस्ट ट्रस्ट यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी किशन हिरा मोटवानी सदस्य गुरुनानक सोशियल ट्रस्ट उपस्थित होते.
ध्वजारोहणाच्या वेळी सर्व कर्मचारी शिक्षक प्राध्यापक प्राचार्य यांनी सानीटायझर व मास्कचा वापर करून सोशियल डिस्टन्स चे पालन करून ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. नंतर पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन प्रकाश पोहनकर सहाय्यक शिक्षक व नियोजन कृष्णा खरकाटे प्राचार्य, सहकारी, प्राध्यापक, शिक्षक व सर्व कर्मचारी वृंद यांनी केली.