तोतलाडोह धरणाचे आज उघडले 10 दरवाजे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

0
109

पूजा उईके
रामटेक तालुका प्रतिनिधी
तोतलाडोह: धरण पातळीत होणारी लक्षणीय वाढ पाहता रामटेक तालुक्यातील तोतलाडोह धरणातील पाणी 95% चा वर गेले असल्याने येथील 14 दरवाज्यांपैकी आज 10 दरवाजे सोडण्यात आलेले आहेत. दि. 16 ऑगस्ट ला सकाळी 8 वाजता तोतलाडोह धरणातील पाणी 95% चावर भरल्याने येथील दरवाजे कोणत्याही वेळी सोडण्यात येण्याची शक्यता दिली होती. त्यानुसार आधी 14 पैकी 4 दरवाजे दि. 15 ऑगस्ट ला सोडण्यात आले होते. यावेळी 95.03% जलसाठा होता. शनिवारी सायंकाळी 5 वाजताचा सुमारास जलसंचयात वाढ होत गेली. तर धरणातील जलसाठ्यात होणारी निरंतर वाढ बघता आज 10 दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपविभागीय पारबंधारे अभियंता राजेश धोटे यांनी सांगितले. तर आज दि. 16 ऑगस्ट ला सकाळी 14 पैकी 10 दरवाजे उघडन्यात आले. तसेच काठावरील लोकांनी मासेमारी व शेतकऱ्यांनी सावध राहावे असे आवाहन प्रशासनामार्फत पेंच पारबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण झोड यांनी दिले आहे.