सिंदेवाहीत शासकीय ध्वजारोहण संपन्न, तहसीलदार मा. गणेश जगदाळे यांनी केले ध्वजारोहण.

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत पोपटे,
नागपूर विभागीय प्रतिनिधी,
दखल न्युज व दखल न्युज भारत.

देशात स्वातंत्र दिनाचा ७४ वा वर्धापनदिन साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून, सिंदेवाही तालुक्यातील तहसील कार्यालयात शासकीय ध्वजारोहण सकाळी ठिक ९-०५ वाजता तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार मा. गणेश जगदाळे यांचे हस्ते पार पडले. ध्वजारोहण कार्यक्रमाला त्यांचेसोबत नायब तहसीलदार श्री. ए. पी. सलामे, नायब तहसीलदार श्री. धात्रक, नायब तहसीलदार श्री. तोडकर, सिंदेवाही नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा लता गंडाटे, मुख्याधिकारी- सुप्रिया राठोड, उपाध्यक्ष- स्वपनील कावळे, पंचायत समिती सभापती- सौ. मंदाताई बाळबुध्दे, उपसभापती- सौ. शिलाताई कन्नाके, माजी सभापती- मधुकर मडावी, पं. स. सदस्य- श्री. रितेश अलमस्त, श्री. रणधीर दुपारे, नगरसेवक श्री. नरेंद्र भैसारे, योगेश कोकुलवार, नगरसेविका सौ. नंदा बोरकर, सौ. मडावी तसेच सिंदेवाही पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक- निशिकांत रामटेके, स. पो. नी. गोपीचंद नेरकर, पंचायत समिती चे गटविकास अधिकारी श्री. अशोक इल्लुरकर, उपविभागीय अभियंता- श्री. विजय नोमुलवार, गटशिक्षणाधिकारी- पालवे, उप‌अधिक्षक (टि. एल. आर. ) नारनवरे आणि अन्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तथा सिंदेवाही शहरातील गनमान्य व्यक्ती व पत्रकार उपस्थित होते. ध्वजारोहण कार्यक्रमात शोशल डिस्टंसिंगचे कटाक्षाने पालन करण्यात आले. शेवटी मा. तहसीलदार गणेश जगदाळे यांचे दालनात उपस्थित मान्यवरांना चॅहापानी देऊन, शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाची सांगता झाली.