Home महाराष्ट्र सरकारने वारकऱ्यांचा विश्वासघात केल्यामुळे येत्या 31 ऑगस्टला चलो पंढरपूर (किमान १...

सरकारने वारकऱ्यांचा विश्वासघात केल्यामुळे येत्या 31 ऑगस्टला चलो पंढरपूर (किमान १ लाख भाविक पंढरपुरात दाखल होणार)

200

 

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
(गुरुप्रसाद कुलकर्णी)

वारकरी सांप्रदायातील सर्व वारकरी संघटनांनी सरकारला वेळोवेळी पत्रव्यवहार केला, तहसील कार्यालयावर निवेदन दिले, पंढरपूरला अमरण उपोषण केले, ठीक ठिकाणी भजन आंदोलन केले राजकीय नेत्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना थेट माहिती सुद्धा दिली पण तरीही कोणत्याही प्रकारचे सरकारने भजन-कीर्तन करण्याकरता परवानगी व मंदिर उघडण्याची परवानगी देण्याबद्दल साधी चर्चासुद्धा न केल्यामुळे महाराष्ट्रातील वारकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर निर्माण झालेला आहे भक्त प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यप त्यांचा नियम होता राज्यात कोणीही देवाचे नाव घ्यायचे नाही (नाव घेऊ नेदे देवाचे/ ऐसे ब्रीद हिरण्य कश्यपुची) आता सरकारला सुद्धा नाईलाजाने हिरण्यकश्यप सरकार म्हणावे लागेल कारण की आमचे वारकरी गावामधे भजन करायला लागले की गावातील नास्तिक मंडळी पोलिस स्टेशनला तक्रार करतात आणि लगेच पोलीस येऊन भजनी मंडळी वर गुन्हे दाखल करतात आज पर्यंत भजन करणाऱ्या मंडळींवर कधी गुन्हे दाखल झालेले पाहिले नाही वारकऱ्यां मध्ये भजन करताना एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सरकारने देशी दारू दुकाने उघडी केली, मॉल उघडी केली, चित्रपट शूटिंग चालु आहे, बँकांच्या समोर भरपूर गर्दी आहे, लग्नामध्ये, अंत्यविधी मध्ये दिलेल्या नियमापेक्षा जास्त गर्दी आहे मग वारकऱ्यांवर एवढे बंधन का महाराष्ट्रातून सर्व वारकरी संघटना जर सरकारला एवढी विनंती करीत आहे तर वारकऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तर देण्याकरिता दोन मिनिट सुद्धा नाहीत का हा सर्व विचार करून सरकारचे डोळे उघडण्या करिता आणि सहन करण्याची क्षमता संपल्यामुळे विश्व वारकरी सेना व महाराष्ट्रातील इतर वारकरी संघटना चलो पंढरपूर चा नारा लावून येत्या 31 ऑगस्टला आम्ही दाखल होऊन पंढरपुरात पांडुरंगाच्या मंदिरा समोर ठिय्या आंदोलन करणार आहोत आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार सरकार राहील
विश्व वारकरी सेनेचे सर्व पदाधिकारी चलो पंढरपूर या विषयाने तहसील कार्यालयावर निवेदन देणार आहेत व इतरही संघटना यावेळेस पाठिंबा न देता स्वतः पुढाकार घेऊन तहसील कार्यालयावर निवेदन देऊन चलो पंढरपूर चा नारा लावून पंढरपूर मध्ये 31 ऑगस्टला दाखल होतील

Previous articleबलात्कार पिडीतेला अभूतपुर्व असा न्याय मिळवुन दिल्याबध्दल चिखली काॅग्रेसच्या वतीने पोलीस चमुचा सत्कार
Next articleसिंदेवाहीत शासकीय ध्वजारोहण संपन्न, तहसीलदार मा. गणेश जगदाळे यांनी केले ध्वजारोहण.