बलात्कार पिडीतेला अभूतपुर्व असा न्याय मिळवुन दिल्याबध्दल चिखली काॅग्रेसच्या वतीने पोलीस चमुचा सत्कार

154

 

 

चिखली: विशेष प्रतिनिधी – मनोज बागडे.
14 आॅगस्ट चिखलीतील व परीसरातील जनतेमध्ये तिव्र संताप उमटण्यास कारणीभुत चिखलीतील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील दोन्ही आरोपींना जिल्हा विशेष न्यायालयाने दिनांक 13 आॅगस्ट रोजी फाशीची शिक्षा सुणावली. पास्को कायदयाच्या अंतर्गत दाखल या गुन्हयात चिखली पोलीसांची कामगिरी महत्वपुर्ण ठरून या कायदया अंतर्गत महाराष्ट्रात कदाचित बलात्का-यांना पहीलीच फाशीची शिक्षा सुणावली जावी अशी अभुतपूर्व घटना घडून आली. त्यामुळे सर्वत्र या निर्णयाचे स्वागत होत असतांनाच या निर्णयामागील तपास कर्ते चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार गुलाबराव वाघ व तपास कर्मचा-यांचा जाहीर सत्कार चिखली काॅग्रेसच्या वतीने चिखली पोलीस स्टेशनमध्ये जावुन करण्यात आला.
निकाल जाहीर होताच त्याच सध्याकांळी सर्वत्र या निर्णयाचे स्वागत होत असतांनाच 14 आॅगस्ट रोजी सकाळी 11वाजता चिखलीतील काॅग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक शहर काॅग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार व तपास कर्मचा-यांचा सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, नगसेवक आसिफ भाई , रफिक सेठ, हाजी राउफ भाई, राजु रज्जाक, गोकुळ शिंगणे, डाॅ. इसरार, खलील बागवान, शहीजाद अल्ली खान, अॅड प्रशांत देशमुख, अॅड विलास नन्हई, वासिद जमदार, शेख शफिक, रमजान चौधरी, यांची उपस्थिती होती.
सदर प्रकरण समाजाला कंलकीत करणारे आहे, पिडीतेवर झालेला आघात माणसीक व शारीरीक स्वरूपाचा आहे. तो कधीही भरून निघणे नाही, परंतु या पिडीतेला न्याय मिळवुन देण्याची जबाबदारी पोलीसांवर होती, या प्रकरणी जनभावना लक्षात घेता पोलीसांनी व तपास करणा-या टिमसह कायदे तज्ञानी जे एकत्रित स्वरूपाचे काम केले, त्या सांघीक प्रयत्नामुळे त्या पिडीतेला आम्ही न्याय मिळुन देऊ शकलो याचा आनंद आहे. असी प्रतिक्रीया ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी यावेळी व्यक्त करून सत्काराबध्दल आभार व्यक्त केले.