Home महाराष्ट्र आवळगाव हळदा रोडवरील पुलाची उंची वाढवा विनोद झोडगे यांची मागणी…

आवळगाव हळदा रोडवरील पुलाची उंची वाढवा विनोद झोडगे यांची मागणी…

177

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

ब्रह्मपुरी :- तालुक्यातील आवळगाव हळदा या गावाला जाणारा रस्ता नेहमीच वर्दळीचा असून त्या भागातील अनेक शेतकरी आपल्या शेतीच्या कामासाठी जात असतात पावसाळ्यात या रोडवर असलेला कमी उंचीचा पुलिया असल्याने अनेकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. आवळगाव हळदा रोडवरील कमी उंचीचा पुल असल्याने त्यांच्या खाली पाईप पूर्णपणे बंद झाल्याने त्याचा संपूर्ण पाणी रोडवर येतो तसेच रोडच्या बाजूला खूप मोठा खड्डा पडला आहे. त्या खड्ड्यात अनेक लोक पडून जखमी सुद्धा झालेत. तसेच अचानक येणार्‍या पावसाच्या लोंढ्याने पुर येत असल्याने वर्दळीचा रस्ता असल्याकारणाने अनेक प्रवाशांना नाईलाजास्तव पुराच्या पाण्यातून मार्ग काढावा लागतो.

अनेक वेळा मार्गक्रमण करतांना मोटारसायकल, सायकल, तसेच काही लोक सुद्धा वाहून गेल्याचे उदाहरण आहेत. बरेच वेळा जीवित हानी टळली असली तरी भविष्यात कमी उंचीचा पुल जीवावर बेतला शिवाय राहणार नाही. वारंवार प्रशासनाला पत्र व्यवहार करून सुद्धा बांधकाम विभाग तसेच लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यास यास जबाबदार कोण? आवळगाव हळदा रोड वरील कमी उंचीच्या पुलाची उंची वाढवा अन्यथा परिसरातील नागरिक आंदोलन करतील असा इशारा विनोद झोडगे यांनी दिला.

Previous articleग्रामपंचायतीच्या आवारातील पाण्याच्या डबक्यात स्वातंत्र्यदिन साजरा, प्रशासनाची अनास्था चव्हाट्यावर
Next articleमंगरूळ ते तीर्थपुरी मेन रोड कोठी या ठिकाणी रस्त्यात पाणी की पाण्यात रस्ता असी परिस्तिथी