ग्रामपंचायतीच्या आवारातील पाण्याच्या डबक्यात स्वातंत्र्यदिन साजरा, प्रशासनाची अनास्था चव्हाट्यावर

तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री प्रमोद क्षिरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण

237

 

 

वणी : परशुराम पोटे

वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजा माणकी येथिल ग्रामपंचायत कार्यालयात तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रमोद क्षिरसागर यांचे हस्ते झेंडावंदन करण्यात आले. परंतु कार्यालयासमोर पाण्याचे डबके साचुन असल्यामुळे पाण्याच्या डबक्यात झेंडावंदन करण्याची वेळ येथिल सचिव धुर्वे व प्रशासनाच्या अनास्थेमुळे आली अाहे.
सविस्तर असे की, गेल्या मार्च महिण्यात येथिल ग्रामपंचायती मधिल सरपंचाचा कार्यकाल समाप्त झाल्यामुळे येथे प्रशासकाची नेमणुक केली आहे. या प्रशासकाकडे एकापेक्षा अधिक गावे असल्यामुळे येथिल कारभारावर ग्रामसेविकाच लक्ष ठेवत आहे. आज १५ आँगष्ट् भारताचा ७४ वा स्वातंत्र्यदिवस हा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याकरिता ग्रामपंचायतींचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित झाले होते.यावेळी सदर ग्रामपंचायतीच्या आवारात चिखल व पाण्याचे डबके पहायला मिळाले.परिणामी चिखलात व पाण्याच्या डबक्यातच झेंडा वंदन करण्यात आल्यामुळे येथिल ग्रामपंच्यायतीची अनास्था चव्हाट्यावर आली आहे.याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.