पोलीस स्टेशन पुराडा येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण व वृक्षारोपण कार्यक्रम

कुरखेडा /राकेश चव्हाण प्र

पोलीस स्टेशन पुराडा येथे ७४ स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रभारी ठाणा इन्चार्ज पोउपनि सुखदेव गोदे यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले याप्रसंगी उपस्थितांना भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनाचे महत्व विषद करित शासनाचे नक्षलवादी विरोधी अभियान ,नक्षलवादी आत्मसमर्पण योजना तसेच विविध योजनांच्या बाबतीत मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी पोउपनि शेळके , जाधव,एसआरपिफ पो नि तरारे,पोउपनि बोरसे,विद्याभारति महाविद्यलयाचे मुख्याध्यापक सी एल डोंगरवार, जि प शाळेचे निंबोरकर सर, समाजसेवक हरिश्चंद्र डोंगरवार व सर्व कर्मचारी वृन्द नागरिक उपस्थीत होते. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गावातील रस्त्यांच्या कडेला मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले