Home अमरावती दिव्यांग विद्यार्थ्यांला दिला ध्वजारोहणाचा मान… कौसल्याबाई बारब्दे विद्यालय ,चिंचोली बु.चा उपक्रम…

दिव्यांग विद्यार्थ्यांला दिला ध्वजारोहणाचा मान… कौसल्याबाई बारब्दे विद्यालय ,चिंचोली बु.चा उपक्रम…

134

सुयोग टोबरे /
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित कौसल्याबाई बारब्दे विद्यालय व क.म.वि.चिंचोली बु. या शाळेत भारताचा ७४वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या वर्षी दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य श्रेणी त उत्तीर्ण शाळेचा दिव्यांग विद्यार्थी चि.पार्थ अशोकराव वानखडे याला ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला.
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर निवडक निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्यात शालेय विद्यार्थ्यांची अनुपस्थिती जाणवत होती.याप्रसंगी शाळा समिती सदस्य श्री शिवरावदादा देशमुख ,श्री विश्वासराव बारब्दे,चिंचोली खुर्द च्या सरपंच सौ अपर्णा संजय बारब्दे ,स्थानिक विकास व व्यवस्थापन समिती चे सर्व पदाधिकारी प्रमोद ओळंबे ,गजानन गायगोले ,पालक प्रतिनिधी अशोकराव वानखडे ,ग्रा.पं सदस्य श्री जितेंद्र इंगळे ,श्री सागर खंडारे यांच्या सह सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रतिनिधी प्रमोद निर्मळ यांनी केले. यानिमित्ताने शालेय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षक सतीश सोळंके तसेच नंदकिशोर बारब्दे यांच्या सह सर्व शालेय घटकांचे सहकार्य लाभले..

Previous articleवणी येथील शाहुमहाराज चौकात स्वातंत्र्यदिन साजरा
Next articleस्व.देवकीबाई बंग विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा (विद्यार्थ्यांनी घेतला ऑनलाइन सहभाग)