भामरागड चा संपर्क तुटला गावात शिरले पुराचे पाणी

अशोक खंडारे उपसंपादक
गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या भामरागड तालुक्यात पुराचे पाणी गावात शिरले त्यामुळे गाव जलमय झाले व नदीला पूर आला असल्याने जगाशी संपर्क तुटला आहे.
मागील सहा ते सात दिवसांपासून संततधार पाऊस पडतो आहे त्यामुळे पर्लकोटा नदीला पूर आला असून पुर्ण बाजारपेठ मध्ये पाणी शिरले व गावं जलमय झाले आहेत कदाचित गावात बोटी चालवाव्या लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे व या तालुक्यातील जवळपास शंभर गावाचा संपर्क तुटला असून नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे