तालुक्यातील दिव्यांग बांधव यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणार- उज्वला बोढारे

99

 

हिंगणा :- १५ अॉगस्ट २०२० स्वतंत्रदिनाचे औचित्य साधून नागपूर जिल्हा परिषद च्या महिला व बाल कल्याण सभापती यांनी दिव्यांग बंधु-भगिनींना स्वतःचे पायावर उभे राहुन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपल्या हिंगणा तालुक्यातील मोंढा येथील ओमप्रकाश काकडे व उमरी (वाघ )येथील कु.पुजा राजेंद्र वाढवे यांना आपल्या सहकार्यातून झेरॉक्स मशीन देण्यात आल्या. दिव्यांग बांधव यांच्या अधिकार प्रति नेहमी आवाज उचलत राहणार त्यांना त्यांचे अधिकार मिळून देणार असे आश्वासन या प्रसंगी बोढारे यांनी दिले या प्रसंगी उपस्थित सर्वश्री प्रविणभाऊ खाडे अध्यक्ष राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टी हिंगणा तालुका, युवराजजी काकडे मा.सदस्य पंचायत समिती,सौ.पौर्णिमा सुशील दिक्षीत सदस्य प.स.हिंगणा, नरेन्द्रजी वाघ सरपंच उमरी(वाघ), रविद्रंजी आदमने सरपंच मोंढा,विलासभाऊ वाघ, तथा उमरी (वाघ )व मोंढा येथील गावकरी बंधु भगिनी उपस्थित होते …