कसर्ला बलात्कार प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा द्या. नागभीड तालुका युवक काँग्रेसची मागणी.

 

प्रतिनिधी/ शुभम पारखी

दि.०८/०८/२०२० ला नागभीड तालुक्यातील कसर्ला या गावामध्ये कु.प्रांजु राजेंद्र वाघमारे वय १६ वर्ष या नाबालीक मुलीवर काहीं नराधामांनी तिच्यावर बलात्कार करून त्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. या संदर्भात नागभीड तालुका युवक काँग्रेस तर्फे या घटनेचा निषेध केला गेला आणि त्या नराधमांवर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी असे निवेदन तालुका युवक काँग्रेस तर्फे मा.पोलिस निरीक्षक,पोलिस स्टेशन नागभीड यांना देण्यात आले.या वेळेस,
चिमूर विधानसभा युवक काँग्रेस कार्यध्यक्ष गौतम पाटील,नागभीड तालुका कार्याध्यक्ष सौरभ मुळे,विधानसभा सोशल मिडिया प्रमुख शुभम पारखी,गिरगाव-वाढोना जि.प.क्षेत्राचे सोशल मिडिया प्रमुख सागर खोब्रागडे,युवा कार्यकर्ते अमोल वानखेडे,गिरगाव-वलनी पं.स.प्रमुख सुधीर बोरकर, युवा कार्यकर्ते आशिष कोडापे,गिरगाव युवक काँग्रेस अध्यक्ष संतोष सोनवाने, युवा कार्यकर्ते नंदू गायकवाड, सूखलदास गुरुनुले व इतर युवक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.