Home गडचिरोली आरमोरीत शेळीपालन , कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय दोन दिवसीय प्रशिक्षण

आरमोरीत शेळीपालन , कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय दोन दिवसीय प्रशिक्षण

21

 

ऋषी सहारे
संपादक

आरमोरी-आधार उद्योग प्रशिक्षण केंद्राच्यावतीने २५ जानेवारी २०२२ रोज मंगळवार ला कृषि उत्पन्न बाजार समिती आरमोरी येथिल सभागृहात दोन दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन पार पडले . या उद्घाटन प्रसंगी प्रशिक्षण केंद्राचे मुख्याधिकारी शंकर लाखे , डॉ . विकास सिंगाडे , बालाजी राऊत,ऋषी सहारे संपादक दखल न्यूज भारत, हरेंद्र मडावी नवभारत तालुका प्रतिनिधी तसेच कृषी बाजार समितीचे सचिव अमिश निमजे व इतर समितीचे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते . सदर प्रशिक्षणामध्ये शेळ्या , कोंबड्या , गाई व म्हैशी च्या जाती व त्यावरील आजार , उपचार व लसीकरणासंबंधी माहीती व सविस्तर मार्गदर्शन डॉ . विकास सिंगाडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले तसेच गोठा व्यवस्थापन मार्केटमधिल खरेदी – विक्री , शासकीय योजनांची व महामंडळाची माहीती व त्यासाठी लागणारे कागदपत्राची माहीती आधार उद्योग प्रशिक्षण केंद्राचे मुख्याधिकारी शंकर लाखे यांनी सदर प्रशिक्षणामध्ये उपस्थित शेतकरयांना समजावून सांगितले . सर्व शेतकऱ्यांना शेतीसोबतच पुरक व्यवसाय म्हणून शेळीपालन , दुग्धव्यवसाय केल्याने शेतकऱ्यांचा त्याचा किती मोठ्या प्रमाणात फायदा होतो व आपण एक चांगले व्यवसायीक तयार होवू शकतो याबाबत प्रशिक्षणाअंतर्गत सविस्तर माहीती आधार उद्योग प्रशिक्षण केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांना पटवून देण्यात आली . तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी सदर प्रशिक्षणाचा लाभ घेतला .

Previous article▪️आज राजेश तुरकर परेड मध्ये चालणार राजपथावर…! ▪️सातव्यांदा बोरकन्हारच्या सुपुत्राची राजधानी दिल्ली परेडसाठी निवड
Next articleतरुण पिढीच्या हातात देशाचे भवितव्य- राहुल पंडित.