ग्राम पंचायत तिमरम (स्थित-गुड्डीगुडम)येथे स्वातंत्र्यदिन शिस्तबद्ध पध्दतीने साजरा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री संदीप सिडाम यांच्याहस्ते ध्वजारोहण

131

 

गुड्डीगुडम प्रतिनिधी /रमेश बामनकर

दखल न्युज नेटवर्क
गुड्डीगुडम – पंचायत समिती अहेरी अंतर्गत येणाऱ्या ग्राम पंचायत कार्यालय तिमरम (स्थित-गुड्डीगुडम)येथे स्वातंत्र्यदिनाच्या पर्शवभूमीवर कोविड-19 चे नियमाचे पालन करीत शोशल डिस्टसिंग नुसार ध्वजारोहण कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे.
सदर तिरंगा ध्वजारोहण तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री संदीप सिडाम यांच्या हस्ते फडकविण्यात आले आहे.
या प्रसंगी पेसा कोष समिती अध्यक्ष श्री रमेश कोरेत, कार्यालयाचे सचिव श्री. चंदू बुरे, माजी सरपंच श्री महेश मडावी, शिपाई श्रीनिवास आईलवार,संगणक चालक डोंगरे, पेसा समितीचे इतर समितीचे पदाधिकारी व सदस्यगन,जि प शाळेचे शिक्षक श्री.पडालवार, गावातील प्रतिष्टित नागरिक उपस्थित होते.