वैरागड : – येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (मोठा मोहल्ला) बौद्ध विहार समोरील समाज मंदिरात अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची बैठक घेण्यात आली.
बैठकीत अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहीदास राऊत, पक्षाचे जिल्हा सरचिटणीस हंसराज उंदिरवाडे आणि कार्यालयीन सचीव अशोक खोब्रागडे यांनी पक्ष वाढीबाबत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मार्गदर्शन करून विविध विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच मोहल्ला कमेटीची स्थापना करण्यात आली. यावेळेस मिलींद भोयर, पुरंधर मेश्राम, पांडुरंग सरदारे, प्रलय सहारे, रविंद्र मेश्राम, हंसराज बोदेले, चोखा सरदारे, रूषी बरडे, दिलांबर भानारकर, सोमाजी खोब्रागडे, भारत भानारकर, सुशील भानारकर तसेच मोहल्ल्यातील बौद्ध बांधव उपस्थित होते.