यंग चांदा ब्रिगेडचे कार्यालय जनसेवेचे केंद्र ठरावे- आ.किशोर जोरगेवार भिवापुर वार्डात यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयाचे उद्घाटन

0
109

 

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात लक्षणीय काम केल्या जात आहे. सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड असणा-यांची ही संस्था असून शेवटच्या गरजू पर्यंत पोहचणे या संस्थेचे लक्ष आहे. यात संस्थेच्या पदाधिका-यांची जबाबदारी मोठी असणार आहे. आज स्वातंत्र दिनी संस्थेचे संघटक अमोल शेंडे यांनी भिवापूर वार्डात यंग चांदा ब्रिगेडचे कार्यालय सुरु केले आहे. ही या संस्थेच्या उदिष्टपूर्तीकडील वाटचाल आहे. असे सांगत हे कार्यालय जनसेवेचे केंद्र ठरावे असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आज शनिवार आमदार किशोर जोरगेवार यांच्या हर्स्ते यंग चांदा ब्रिगेडचे संघटक अमोल शेंडे यांनी भिवापूर वार्ड येथे सुरु केलेल्या यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी परिसरातील गुणवंत विद्यार्थी व निवृत्त कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडचे राजू जोशी, कलाकार मल्लारप, वंदना हातगावकर, वैशाली रामटेके, दुर्गा वैरागडे, विमल काटकर, राशिद हुसैन, सलिम शेख, आदिंची उपस्थिती होती.

यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने विविध उपक्रमातून जनसेवेचे कार्य केल्या जात आहे. समाजाप्रती तळमळ असलेल्या कार्यकर्त्यांच्या साथीने या संस्थेने अत्यंत अल्प काळात सामाजिक क्षेत्रात मोठे नाव केले आहे. चंद्रपूरातील सर्वसामान्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून केल्या जात आहे. कोरोनाच्या संकट काळात या संस्थेचे काम विशेष लक्षणीय राहिले स्वताच्या जिवाची पर्वा न करता संस्थेच्या सदस्यांनी गरजुंना शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न केला. टाळेबंदीत अडकलेल्यांसाठी जेवणाचे टिफिन वाटपाचा उपक्रमातून गरजुंपर्यंत पोहचविण्यात आले, या काळात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने धान्य व किराणा किटचे वाटप करुन गरजूंपर्यत मदत पोहचविण्यात आली. आजही कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने प्रतिबंधीत करण्यात आलेल्या क्षेत्रात यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या वतीने भाजीपाला किटचे वाटप केल्या जात आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. आज स्वातंत्रदिनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयाचे उद्घाटन करतांना आंनद होत आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून या प्रभागातील अधिकाधिक नागरिकांच्या समस्या सोडविल्या जाव्हात, हे कार्यालय नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे प्रमुख केंद्र ठरावे, नागरिकांना आपल्या हक्काचे केंद्र वाटावे असे काम या कार्यालयातून घडावेत अशी आशा

यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली. तसेच यावेळी आ. जोरगेवार यांनी उपस्थितांना स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी वेकोली व महावितरण मधून सेवा निवृत्त झालेल्या कर्मचा-यासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणार आला. यावेळी परिसरातील मधूकर बनकर, भाऊराव चन्ने, मोरेश्वर भरटकर, शरद बनकर, सुरेश महाडोळे, अरुणजी सातपैसे, संतोष तरारे, किशोर पातन, दिलीप महाडोळे, मनिष जूनघरे आदिंची उपस्थिती होती.

प्रभागातील नागरिकांच्या हक्काचे कार्यालय – अमोल शेंडे
आमदार किशोर जोरगेवार यांच्या मार्गदशात प्रभागातील नागरिकांपर्यत पोहचवून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे काम आमच्या वतीने केल्या जात आहे. मात्र नागरिकांनाही आमच्या पर्यंत सहज पोहचता यावे या करीता हे कार्यालय सुरु करण्यात आले असून त्यांनी हे कार्यालय त्यांच्या हक्काचे आहे असे प्रतिपादन यंग चांदा ब्रिगेडचे संघटक अमोल शेंडे यांनी केले.