मा. डॉ अभिषेक कुंभरे तालुका वैद्यकीय अधिकारी वडसा तथा वैदयकिय अधिकारी कोरेगाव यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहन कोरोना योद्धा चा पुष्पगुच्छ देऊन सत्कार

188

 

पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
देसाईगंज/वडसा
दखल न्यूज भारत

कोरेगाव – प्राथमिक आरोग्य केंद्र कोरेगाव येथे ७४ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडा वंदन कार्यक्रम मा. डॉ. अभिषेक कुंभरे तालुका वैद्यकीय अधिकारी वडसा तथा वैदयकिय अधिकारी कोरेगाव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
संपूर्ण जगात उद्धभवलेल्या कोविड-१९ साथरोग पार्श्वभूमीवर आपल्या कार्यक्षेत्रात कोरोना विरोधात लढत असतांना देशासाठी व समाजासाठी जीवाची पर्वा न करता स्वतःच्या जीवाची ढाल बनवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्यरत केले. त्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तंबाखू मुक्त ची शपथ घेण्यात आली.
कार्यक्रमाला उपस्थित मा. डॉ अभिषेक कुंभरे तालुका वैद्यकीय अधिकारी वडसा तथा वैदयकिय अधिकारी, डॉ. यशश्री लिमजे वैद्यकीय अधिकारी तथा तालुका कुष्ठरोग तंत्रज्ञ दिनकर संदोकर, चंद्रकांत चहारे आरोग्य सहाय्यक तथा सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.