साकोली/सेंदुरवाफा येथे ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहनाचा कार्यक्रम

0
97

 

उपजिल्हा प्रतिनिधी-निलय झोडे

साकोली/सेदुरवाफा-येथील होमगार्ड परेड ग्राऊंड येथे मा.तहसिलदार व प्रभारी उपविभागीय अधिकारी श्री.बाळासाहेब टेळे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.तसेच नगरपरिषद कार्यालय साकोली येथे नगराध्यक्ष सौ.धनवंताताई राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला
नगरपरिषद कार्यालय क्र.२ सेंदुरवाफा येथे नगरपरिषदचे उपाध्यक्ष श्री.जगनजी उके यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी साकोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार श्री.बाळाभाऊ काशीवार,न.प.मुख्याधिकारी माधुरी मडावी, नगराध्यक्ष धनवंता राऊत,व नगरसेवक उपस्थित होते.आणि झेंडा चौक सेंदुरवाफा येथे माजी आमदार बाळाभाऊ काशीवार यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.