कोरोणा यौध्दाचे सामाजिक औदार्य सन्मानापलिकडे-खा.सुनिल मेंढे

 

प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

15 ऑगस्ट
पवनी-कोरोणा आजाराच्या संपर्कात नातेवाईक येत नाही. त्यांच्या मदतीला फक्त सरकारी मानसे असतात. अगदी मयतीतही, अशा संसर्गजन्य आजाराच्या काळात काही लोक तुमच्या मदतीला येतात. सेवा देतात, हे ईस्वरी कार्य आहे. म्हणूनच कोरोणा योध्याचे औदार्य सन्मानापलिकडे आहे. असे विचार खा. सुनील मेंढे यांनी मांडले.

लक्ष्मीरमा सभागृह पवनी येथे कोरोणा यौध्यांचा सन्मान समारंभात ते बोलत होते. १५ आगष्ट च्या मुहूर्तावर पवनी तालुका भाजपने सदर कार्यक्रम आयोजित केला होता. व्यासपीठावर उद्घघाटक म्हणुन न.प. पवनीच्या नगराध्यक्ष पुनम काटेखाये, अध्यक्षस्थानी अँड.रामचंद्र अवसरे, प्रमुख पाहुणे म्हणून विलास काटेखाये, अनिल मेंढे, किशोर पंचभाई, पोलिस निरीक्षक सोलसे, उपनिरीक्षक पांडे, न.प. पवनीचे मुख्याधिकारी रवींद्र ढाके होते.

कोरोणा संमक्रणकाळात उत्तम काम केलेले बांधिलकी ग्रुप पवनी, पोलीस विभाग, नगरपरिषदेचे कर्मचारी, आरोग्य विभाग, राजमुद्रा ग्रुप कोंढा, स्वरगंधा ग्रुप अड्याळ, आझाद शेतकरी संघटना, दिपक तिघरेचा वलनी ग्रुप,मांगली, बोरगाव येथील योध्द्योंचा सन्मान पत्रक, शाल, श्रीफळ व गुलाब देऊन सन्मानित करण्यात आले. प्रोजेक्टरवर यांच्या कामाचे प्रेंझेटेशन दाखवण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र फुलबांधे, प्रकाश कुर्झेकर, हिरालाल वैद्य, सुरेंद्र आयतुलवार, मश्चिंद्र हटवार, दत्तु मुनरतीवार, माधुरी नखाते, सिमा मोहिते, अनुराधा बुराडे, निर्मला तलमले, अजय चव्हान, संदिप नंदरधने, सोनु कोरेकर, किशोर जिभकाटे, भाष्कर उरकुडकर, संदिप समर्थ, अमोल उराडे, शरद देव्हाडे, मोहन कुर्झेकर, विलास गिरडकर,परसुराम समरित, शंकुल शहारे, लिलाधर काटेखाये, कैलास सेलोकर, गोलु मुंडले यांनी प्रयत्न केले.