श्रीमती आनंदी मलोकार कृषी तंत्र विद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

161

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

श्रीमती आनंदीबाई मालोकर कृषि तंत्र विद्यालय निंबी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे ७४ वा स्वातंत्र्य दीन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयातील प्राचार्य डॉ.मोहम्मद साजिद यांनी ध्वजारोहण केले व स्वतंत्र दिना चे महत्त्व विषद करून आत्मनिर्भर भारत या उपक्रमाची माहिती दिली. कोविड -१९ महामारीची परिस्थिती लक्षात घेता सर्व कर्मचारी व मजूर वर्ग कार्यक्रमाच्या वेळी मास्क व सामाजिक अंतर ठेवून उपस्थित होते. या पवित्र दिनाचे औचित्य साधून सर्वांना मास्क चे वितरण करण्यात आले ,सर्वांच्या शरीराचे तापमान मोजण्यात आले. कार्यक्रमाची सांगता विद्यालयात वृषारोपण करून झाली यावेळी
निलेश भगत, गजानन सुरळकर शिक्षकवृंद व इतर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने होते.