खेड ; परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे कोव्हीड केयर सेंटरचे उदघाटन

 

प्रतिनिधी : विनोद क्षीरसागर

खेड – रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मध्ये कोरोना ग्रामस्थांनची वाढती संख्या लक्षात घेऊन खेड तालुक्यातील घाणेखुंट – लोटे येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे खेड मधील दुसऱ्या कोव्हीड केयर सेंटर चे उदघाटन आज १५ ऑगष्ट रोजी उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांच्या हस्ते झाले. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील , तहसीलदार प्राजक्ता घोरपडे , पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की , कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संभाजी गरुड , एमईएस इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स चे संचालक डॉ शाम भाकरे , डॉ चेतन कदम हे उपस्थित होते.
खेड मध्ये कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे , खेड मध्ये लवेल येथे एकच घरडा कोव्हीड केयर सेंटर असून त्याची मर्यादा १०० बेडची आहे. तर कोव्हीड हॉस्पिटल असलेल्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात ५० बेडची मर्यादा असून आता सध्यस्थितीत केवळ ३० बेड कार्यान्वित करण्यात आले आहेत. घरडा सीसीसी मध्ये सस्पेक्टेड आणि अन सीमटेमेटिक कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण दाखल आहेत. तर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात सिमटेमेटिक म्हणजेच लक्षणे असलेली कोरोनाग्रस्थ रुग्ण उपचार घेतात. यातच गंभीर आजारी असलेल्या कोव्हीड पॉसिटीव्ह रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येते. कोरोनाग्रास्थांची खेड मध्ये वाढती संख्या लक्षात घेता , घाणेखुंट लोटे येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे आज १५ ऑगष्ट पासून कोव्हीड केयर सेंटर सुरु करण्यात आले आहे ,
शासनाने निर्गमित केलेल्या दरांमध्ये या रुग्णालयात कोरोनाग्रस्थांवर उपचार करण्यात येणार आहेत , या रुग्णालयात ३० बेड असून ३० रुग्णांवर या रुग्णालयात उपचार सुरु करण्यात येणार आहेत. हे उदघाटन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील , तहसीलदार प्राजक्ता घोरपडे , पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की , कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संभाजी गरुड , एमईएस इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स चे संचालक डॉ शाम भाकरे , डॉ चेतन कदम , परशुराम हॉस्पिटल मधील डॉ सचिन उत्पात , डॉ . बाळ , एमईएस नर्सिंग कॉलेज चे प्राचार्य मिलिंद काळे , घाणेखुंट चे सरपंच अंकुश काते उपस्थित होते.

*दखल न्यूज भारत*