कुरखेडा येथे विविध ठिकाणीस्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण

129

कुरखेडा /राकेश चव्हाण प्र

कुरखेडा येथे 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते भारतीय राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात आले. यात मुख्यतः नगरपंचायत कार्यालयात प्र. नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे ,गांधी चौक येथे माजी नगराध्यक्ष डॉ महेंद्रकुमार मोहबंसी व व स्थानिक तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उप विभागीय अधिकारी समाधान शेंडगे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत covid-19 या महामारी ला रोखण्याकरिता मुख्य भूमीका बजावणाऱ्या कोरोना योद्धा यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.