६९४ घर व गोठय़ांची पडझड, पावसाचा जोर कायम

0
88

 

 

प्रतिनिधी
राहुल उके
दखल न्यूज भारत

गोंदिया,दि.15ः-यंदा कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या शेतकरी व नागरिकांना दमदार पावसाची प्रतिक्षा अखेरीस ऑगस्टच्या सुरुवातीपासून पूर्ण होत आहे. गत पाच दिवसापासून जिल्ह्यात नियमीत हजेरी लागत आहे. यादरम्यान काही ठिकाणी अतवृष्टीही झाली. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक सुखावला असला तरी गत पंधरवाड्यात नैसर्गिक आपत्तीमुळे आठ जणांना जीव गमवावे लागले, तर ६९४ घर व गोठ्यांची पडझड झाली आहे.
गत काही वषार्पासून पावसाच्या लहरीपणाचा सामना जिल्हावासीयांना करावा लागत आहे. गत वर्षी उशिरा का होईना सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस दिलासा देऊन गेला. मात्र यंदा मान्सूनपासूनच पावसाने हुलकावनी दिली. त्यामुळे धान नर्सरी व रोवण्या संकटात आल्या होत्या. मात्र र्शावण मासातील र्शावणधारा सर्वांनाच सुखावून गेल्या आहेत. गत पाच दिवसापासून जिल्ह्यात नियमीत पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे धान नर्सरीला जीवदान मिळाले असून रोवणीच्या कामाला वेग आला आहे.
यादरम्यान जिल्ह्यातील काही भागात अतवृष्टीची नोंद झाली असून पावसामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीत ८ जणांना आपले जीव गमवावे लागले. यात तिरोडा, गोरेगाव व अर्जुनी मोर तालुक्यात वीज पडून प्रत्येकी दोघांचा तर आमगाव तालुक्यात एकाचा मृत्यू झाला. तसेच देवरी तालुक्यात नदीच्या पुरात एक जण वाहून गेल्याने मृत्यू झाला. संततधार पावसामुळे ६९४ घर व गोठ्यांची पडझड होऊन नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले. यात गोंदिया तालुक्यात २ पक्के व १७३ कच्च्या घरांचा समावेश आहे. तिरोडा तालुक्यात ३२ कच्चे घर व ४ गोठे, गोरेगाव ४५ कच्चे घर व ११ गोठे, अजुर्नी मोर २0 कच्चे घर, देवरी ३१ कच्चे घर व ४ गोठे, आमगाव ६१ घर व १३ गोठे, सडक अजुर्नी २५७ कच्चे घर व ३९ गोठ्यांचा समावेश आहे. तर देवरी ३ व सडक अर्जुनी तालुक्यात १ असे एकूण ४ जनावरांचा नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाला.