Home चंद्रपूर  बल्लारपुर पुरोगामी पत्रकार संघाची पहिली संयुक्त सभा उत्साहात संपन्न :-नरेंद्र सोनारकर

बल्लारपुर पुरोगामी पत्रकार संघाची पहिली संयुक्त सभा उत्साहात संपन्न :-नरेंद्र सोनारकर

168

 

शंकर महाकाली
दख़ल न्यूज़ भारत
पोर्टेल न्यूज़ व यूट्यूब चैनल
चंद्रपुर/बल्लारपुर तालुका प्रतिनिधि
📲 8855043420

बल्लारपुर :- पुरोगामी पत्रकार संघाची चंद्रपूर जिल्हा संयुक्त सभा स्थानिक हॉटेल स्केयर पॉईंट येथील हॉल मध्ये नुकतीच संपन्न झाली.चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात पुरोगामी पत्रकार संघाची कार्यकारणी गठीत व्हावी यासाठी प्रत्येकांनीं संयुक्तिक प्रयत्न करण्याचे एकमताने ठरविण्यात आले.

पूर्वविदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर,पूर्वविदर्भ प्रमुख कायदेविषयक सल्लागार एड.राजेश सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहाने संपन्न झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा संघटक रुपेश निमसरकर,जिल्हा संपर्क प्रमुख सुजय वाघमारे, जिल्हा प्रभारी निलेश ठाकरे,जिल्हा उपाध्यक्ष राकेश सोमाणी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पुरोगामी पत्रकार संघाचे बल्लारपूर तालुका अध्यक्ष प्रशांत रणदिवे यांनी आयोजित केलेल्या या संयुक्त बैठकीत जिवती,राजुरा,चंद्रपूर येथील पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा गौरव करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

या कार्यक्रमात जिल्हा पदाधिकाऱ्यांनी संघाचे ध्येय धोरण आणि उद्दिष्ट नमूद केले.तर एड.राजेश सिंग यांनी पत्रकारांनी बिनधास्त लिखाण करावे, कायद्याची जिथे कुठे अडचण येईल,तिथे आपण पत्रकारांच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमात पुरोगामी पत्रकार संघटने चे तालुका अध्यक्ष प्रशांत रणदिवे,कार्यकारी अध्यक्ष विकास दुपारे,उपाध्यक्ष आरिफ शेख, सचिव शंकर महाकाली, सहसचिव पराग गुंडेवार, कोषाध्यक्ष गौतम कामळे,प्रसिद्धि प्रमुख राकेश कामळे,व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माणकी येथे स्वातंत्र्यदिन साजरा शाळा समिती अध्यक्ष श्री अनिल ठेंगणे यांच्या हस्ते ध्वजारोहण
Next article६९४ घर व गोठय़ांची पडझड, पावसाचा जोर कायम