जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माणकी येथे स्वातंत्र्यदिन साजरा शाळा समिती अध्यक्ष श्री अनिल ठेंगणे यांच्या हस्ते ध्वजारोहण

 

वणी : परशुराम पोटे

वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माणकी येथे कोविड -19 प्रादुर्भाव लक्षात घेऊन व सोशल डिस्टंन्सिगचे पालन करून ७३ वा स्वातंत्र्यदिन कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री अनिल ठेंगणे यांच्या हस्ते ध्वजा रोहन करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुनिल लोनगाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी उपाध्यक्ष श्री.विजय काकडे,प्रशांत माहुरे,सौ.माधुरी काकडे,सौ वैद्य,तंटामुक्ता अध्यक्ष प्रमोद क्षिरसागर,माजी सरपंच भवानी मांदाडे,कैलास पिपराडे,माजी अध्यक्ष परशुराम पोटे, तलाठी मडपाचे,ग्रामसेवक सौ.सिमा धुर्वे,अंगणवाडी सेविका सौ.बेबीताई मालेकर,मदतनिस सौ.पत्रकार ,शिक्षक आनंद पाटील ,कैलास कुळमेथे,राटेके, आवारी,सौ.मोहितकर,यांचेसह शिक्षक व्रुंद उपस्थित होते.