दखल न्यूज भारत चे कार्यकारी संपादक सुनील साळवे यांचा कोव्हीड योद्धा म्हणून महादुला कोराडीत सत्कार

310

 

दखल न्युज भारत टीम

महादुला-कोराडी /नागपुर१५ आँगस्ट २०२०
विदर्भातील वेगवान आँनलाइन पोर्टल व यु ट्युब चैनल विदर्भ TV तर्फे १५ आँगस्ट निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात कोरोना योद्धा म्हणून दखल न्युज भारत पोर्टल व यु ट्युब चैनल चे कार्यकारी संपादक सुनील साळवे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
विदर्भ TV च्या स्टुडिओ चे उद्घाटन माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाल्या नंतर उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर देशभक्तीपर गाण्यांची सुरुवात नागपुरातील नामवंत गायक व आर्केस्ट्रा संचालक सनी लोखंडे यांनी केली. एकापरस एक देशभक्ती पर गाण्यांची प्रस्तुती झाल्यानंतर *विदर्भ TV तर्फे* ग्रांउड झिरो लेवलवर जाऊन कोरोना संकटात बातम्या कलेक्ट करुन जनतेपर्यंत पोहोचविणाऱ्या पत्रकार, डॉक्टर, आशा वर्कर यांना कोव्हीड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. यामध्ये दखल न्युज भारत पोर्टल व यु ट्युब चैनल चे कार्यकारी संपादक सुनील साळवे यांचा कोव्हीड योद्धा म्हणून सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांनी सत्कार केला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रकाशभाऊ खापरे, नानाभाऊ कंभाले तसेच राजेश काकडे यांचे हस्ते कोव्हीड योद्धा म्हणून सन्मानित केले.
यावेळी कोव्हीड योद्धा म्हणून पं. स सदस्य राहुल तिवारी (पत्रकार), राजेश खंडारे (पत्रकार), आशा वर्कर इशरत शेख, डॉ. नवघरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती श्रीवास नगर तसेच माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी, नगराध्यक्ष राजेश रंगारी यांचा पण सत्कार करण्यात आला.
विदर्भ TV चे संचालक सचीन मुन, संपादक महेश नागपुरे यांचा पण सार्वजनिक सत्कार करण्यात आला.विदर्भ TV चे नागपुर ग्रामीण हेड पत्रकार शैलेश ढोरे यांच्या नेतृत्वाखाली महादुला कोराडी येथे विदर्भ TV चे आँफिस उघडले गेले.

त्यांनी कोरोना काळात ग्राऊंड झिरो लेवलवर जाऊन अधिकांश बातम्या कव्हर केल्या आणि शासन प्रशासनाला जागे केले. आज त्यांचा वाढदिवस पण होता.माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विदर्भ TV च्या आँफिस मध्ये शैलेश ढोरे यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सुरेख संचालन जांभुळकर ताई यांनी केले.