अकोट युवक कॉंग्रेसच्या वतिने वृक्षारोपण कार्यक्रम

150

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

आज दि.15 आॅगस्ट रोजी अकोट युवक कॉंग्रेसच्या वतीने स्वातंत्र दिनाचे अौचित्त साधुन स्वातंत्रदिवस हा आगळ्यावेगळ्या पद्धतीने म्हणजेच वृक्षारोपण करून साजरा करण्यांत अाला. पर्यावरण,निसर्ग हे अधिकाधिक सुंदर रहावे.म्हणून या उद्देशाने एक झाड एक कार्यकर्ता हा उपक्रम स्वातंत्र दिवस पाहता अकोट युवक कॉंग्रेसच्या वतीने अकोट शहरात विविध प्रकारचे झाडे लावण्यात आले.यामध्ये विशेषत: आंब्याचे झाड हे आवर्जुन लावल्या गेले व ह्या झाडांची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्ता यांना देण्यात आली.की जेणेकरून भविष्यात झाडांची कमतरता होणार नाही या उद्देशाने आज वृक्षारोपणाने आजचा दिवस हा स्मरणात रहावा म्हणून अश्या प्रकारचा उपक्रम राबवून स्वातंत्र दिवस साजरा करण्यात आला. वृक्षारोपण करते वेळी कॉंग्रेस ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष तथा अकोला लोकसभा युवक कॉंग्रेसचे जिल्हा प्रवक्ता मिलींद नितोने,कॉंग्रेस ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रोशन चिंचोलकार, तालुका अध्यक्ष निलेश आग्रे, शहर अध्यक्ष विवेक सरदार,विद्यार्थी प्रतिनिधि अभय तेलगोटे, ऋत्वीक सोनटक्के, संदेश एकीरे,अक्षय जायले,भुषन नाथे आदि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.