फ्रीडम इंग्लिश स्कूल मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

फ्रीडम इंग्लिश कूल प्रभाग क्र. ७ गजानन नगर अकोट मधे १५ ऑगस्ट स्वतंत्रता दिवसानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित केला असता. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिति म्हणून माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चोखंडे,शिवसेना गटनेता नगरसेवक मनीष रामाभाऊ कराळे यांच्यासह नगरसेविका गंगाबाई चंदन ह्या लाभल्या होत्या.तसेच यावेळी फ्रीडम स्कूल चे संचालक मनोज झाडे व खोडके सर हे सुध्दा उपस्थित होते.यावेळी प्रमुख उपस्थिती असलेल्या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.कोरोना प्रादुर्भाव परिस्थिति असल्याने आज विद्यार्थ्यांची उपस्थिति नव्हती फ्रीडम स्कूलचे शिक्षक व कर्मचारी अशा अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितित सुरक्षित अंतर ठेवत हा कार्यक्रम संपन्न झाला.