नवेगाव (वेलगुर) येथे मोठी जीवित हानी टळली, विद्युत तारासह पोल कोसळले जमिनीवर.

174

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(गडचिरोली जिल्हा)

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुका मुख्यालयांपासून 20 ते 25 किमी अंतरावरील नवेगाव (वेलगुर) येथे दि. 15/8/2020 रोजी सायंकाळला 5.00 वाजता येथिल आरोग्य उपकेंद्रा समोरील वीज वितरण कंपनीचे दोन्ही पोल कोसळल्याने मोठी जीवितहानी टळली.
सविस्तर वृत्त अशे की मागील दोन दिवसापासून चालू असलेल्या रिमझिम पावसामध्ये अहेरी तालुक्यातील मौजा नवेगाव येथील हनुमान मंदिर परीसरातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र समोरील विद्युत ताराजवळ जीर्ण अवस्थेत फार जुने व विशाल असे आंब्याचे वृक्ष असून सदर आंब्याच्या झाडांच्या फांद्या विद्युत तारांवरती पडल्याने वीज वितरण कंपनीचे दोन्ही पोल जमिनीपासून तुटून खाली कोसळले. सदर घटनेच्या काही वेळेपूर्वी उपकेंद्रामध्ये तपासणी तथा इतर उपचारासाठी आलेल्या गरोदर व स्तनदा माता ह्या काही क्षणापूर्वीच तिथून निघून गेल्या होत्या हे विशेष व रिमझिम पाऊस सुरू असल्याने कुणीही बाहेर नसल्याने तसेच पोल हे उपकेंद्राच्या दिसेला न पडल्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. त्वरित आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी वीज वितरण कम्पणीच्या कर्मचाऱ्यांना माहिती देवून विजप्रवाह खंडीत करण्यात आला. सदर ठिकाणी गावातील हनुमान मंदिर, माता मंदिर तसेच आरोग्य विभागाचे आरोग्य उपकेंद्र असल्याने वीज वितरण कंपनीने त्यावर त्वरीत उपाययोजना करावी असे मत ग्रामस्थाकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यावर तात्पुरती उपाययोजना वीज वितरणचे कर्मचारी मा. गौतमजी सोरते व त्यांचे मित्र अजय शेंडे यांनी उपलब्ध करून दिल्याने
त्यांचे सर्वत्र कौतुक हॊत आहे. अशीच कार्यतत्परता सर्व कर्मचारी यांनी दाखविली तर परिसरातील जनतेला उत्कृष्ट सेवा उपलब्ध करून देता येईल असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.