राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार बदल आत्मसात करावे लागतील – माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील

139

 

इंदापूर तालुका प्रतिनिधी दि .15 बाळासाहेब सुतार,

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये 74 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त झालेल्या समारंभ प्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वरील मत व्यक्त केले.हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ गेले चार-पाच महिने शिस्तीने कोरणाच्या संदर्भात आपण सर्वजण पथ्य पाळत आहात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून सुवर्णपदक मिळत असल्याने आम्हाला संस्थेचा सार्थ अभिमान वाटतो. प्रत्येक विभागातून विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्रात्त केल्यास संस्थेचा ब्रँड तयार होईल. राष्ट्रीय शिक्षण धोरण नुसार नवीन बदल आत्मसात करावे लागतील. तंत्रज्ञानाचा योग्य अवलंब करून नवीन पिढी घडवली पाहिजे.’

मुकुंद शहा म्हणाले की,’ संस्थेच्या बाबतीत सांगावयाचे झाल्यास अनेक गुणवत्तापूर्ण शैक्षणिक प्रगतीने संस्था, महाविद्यालयाचे नाव सर्वत्र होत आहे.’

प्रास्ताविकात इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी आपण एल.एम.एस सिस्टिम च्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण प्रभावीपणे राबवीत आहोत हे सांगून महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा सांगितला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडासंचालक डॉ. भरत भुजबळ यांनी केले. आभार उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे यांनी मानले.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160