मुलुंड कॅम्प मनपा शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा

 

दिलीप अहिनवे
मुंबई महानगर प्रतिनिधी
‘दखल न्युज भारत’

मुलुंड, दि. १५ : बृहन्मुंबई महानगरपालिका मुलुंड ‘टी’ विभागातील मुलुंड कॅम्प मनपा शाळा संकुलात ७४ वा स्वातंत्र्यदिन साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सामाजिक अंतर, तोंडाला मास्क व पाच व्यक्तींची उपस्थिती या शासनाच्या नियमांचे पालन करण्यात आले.

मुलुंड कॅम्प इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच इमारत प्रमुख रिओ साबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मुलुंड कॅम्प मराठी शाळा क्र. २ चे मुख्याध्यापक मनोज पवार व गुजराती शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका मीनाक्षी मॅडम उपस्थित होत्या.

मुलांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची परंपरा यावर्षी खंडित झाली. दरवर्षी भव्य प्रभात फेरीचे आयोजन केले जात होते. संपुर्ण परिसर दुमदुमून जायचा. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘जय जवान जय किसान’ व ‘स्वातंत्र्य दिनाचा विजय असो’ अशा घोषणा देताना मुलांना किती आनंद व्हायचा. शाळेमध्ये विविध स्पर्धा घेतल्या जायच्या. पारितोषिक वितरण देखील केले जायचे. स्थानिक नगरसेवक व मनपा अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित असायचे. कोरोनामुळे मुलांच्या व शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडले. प्रथमच मुलांशिवाय स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागला. यावर्षी सर्वच कार्यक्रम शांतपणे, साधेपणाने व काही तर घरीच साजरे केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण शिक्षक यशवंत चव्हाण यांनी केले तर शेवटी सर्वांचे आभार प्रशिक्षक प्रदीप निकम यांनी मानले.