प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद केंद्र शाळा तुळई यांच्यावतीने स्वातंत्र्य दिन साजरा!

0
213

मुरबाड दिनांक 15, (सुभाष जाधव) मुरबाड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तुळई व जिल्हा परिषद केंद्र शाळा तुळई यांच्यावतीने 58 वा स्वातंत्र्य दिन सोशल डिस्टन पालून साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय घटनेचे प्रास्ताविका चे वाचन करण्यात आले. कोरोना संसर्गजन्य आजारामुळे सोशल डिस्टन्स चे पालन करून तोंडावर मास बांधून हा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मिलिंद चन्ने साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तसेच जिल्हा परिषद केंद्र शाळा तुळई या शाळेचे ध्वजारोहण सरपंच अभय हरड यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व ग्रामपंचायत सदस्य बाळा चौधरी, उपसरपंच अलका जाधव, ग्रामशिक्षण समितीचे सदस्य दत्तात्रय जाधव, अंगणवाडी कार्यकर्त्या सुनंदा चौधरी, आरोग्य सेवक रमेश चौधरी पोलीस पाटील शिवाजी चौधरी ग्रामस्थ नितीन चौधरी, पत्रकार सुभाष जाधव प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मिलिंद च न्ने. यांनी धोरणाचाप्रादुर्भाव रोखण्यासाठी माक्स चे वाटप करण्यात आले.