अवैध दारू विक्री बंद करा.. महिलांचे ठाणेदारास निवेदन सादर…

 

ऋषी सहारे
संपादक

आरमोरी शहरातील बर्डी व इंदिरा बेघर येथे सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करा , अशी मागणी नवीन वघाळा बर्डी येथील मुक्तीपथ गाव संघटनेच्या महिलांनी आरमोरीचे ठाणेदार यांच्याकडे निवेदनातून केली आहे . निवेदनात म्हटले आहे की , गावाजवळ सुरू असलेली अवैध दारू विक्रीमुळे वॉर्डातील व गावातील तरून जात आहे . गावाची शांतता भंग होत आहे व पिढी वाईट व्यसनाच्या आहारी जात असून आरोग्य धोक्यात आले आहे .ठाणेदारांना अवैध दारूविक्री बंद करा असे महिलांचे निवेदन आहे . महिलांनी संघटन तयार केले, संघटनेच्या माध्यमातून दारू विक्री करू नका , असे सांगण्याकरिता गेले दारूविक्रेत्यांकडुन धमकी देण्यात येते . त्यामुळे अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी पोलिस विभागाने सहकार्य करावे , अशी मागणी महिलांनी निवेदनातून केली आहे . सोबतच अवैध दारूविक्रेत्यांची यादी सुद्धा दिली असून गावालगतच्या वॉर्डातील अवैध दारू विक्री बंद करा असे ही निवेदनात म्हटले आहे.