लसीकरण मोहीमेत देवरी ग्राम पंचायत तालुक्यात प्रथम

 

अकोट प्रतिनिधी

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीमे अतंर्गत ९०% पेक्षा जास्त लसीकरण केलेल्या २८६ ग्राम पंचायत मधुन निवड करुन पारीतोषीक वितरण करण्यात आले.
नागरीकांनी कोरोणा प्रतिबंधात्मक लसीकरण करावे या करीता जिल्हा परीषद व जिल्हा प्रशासनाद्वारे ग्राम पंचायत साठी प्रोस्ताहनपर योजना राबवीण्यात आली त्यातुन अकोट ता. ६६ ग्राम पंचायती मधुन प्रथम बक्षीस देवरी ग्राम पंचायत ने (१२१)% पटकावले या वेळी हे बक्षीस वितरण जि. प. अध्यक्ष प्रतिभाताई भोजने ,जिल्हाधीकारी निमा अरोरा,आ.अमोल मिटकरी जि.प. सि. ई. ओ.सौरभ कटीयार,मविम चे सहनियञंक केशव पवार ,जिल्हा ओरोग्य अधिकारी डॉ.आसोले उपस्थीत होते .
हा पुरस्कार देवरी संरपच सौ. वर्षाताई संतोष गायकवाड सचिव दिपीका लाखे यांनी स्वीकारला याजे श्रेय ते गावातील सुज्ञ नागरिक व आरोग्य वीभागाची चमु (पचांगे मॅडम) , आशा सेविका, सर्व ग्राम पंचायत सदस्य ,युवा वर्ग यांना देतात. या पुढे सुद्धा देशावर असलेल्या ओमीक्रान चे संकट पाहता गावातील राहीलेल्या लोकांना लसीकरणासाठी ग्राम पंचायत लस देण्यासाठी व स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्नशील आहेत.