अन शेतकऱ्यांने जावयाला आणण्यासाठी पाठविला चक्क ….हेलिकॉप्टर शेतकऱ्याचा नादच खुळा राव

 

हर्ष साखरे उपसंपादक

नाशिक : हौसेला मोल नसते असे म्हणतात अन् त्यात हौशी शेतकरी असेल तर विचारायलाच नको . पाच एका शेतकरी वधुपित्याने आपल्या लाडक्या कन्येच्या लग्नात नवरदेवाला आणण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवले . नवरदेवाच्या घरापासून विवाहस्थळ अवघे पाच कि . मी . असताना हौसेसाठी हेलिकॉप्टरला मात्र दहा किमीचा फेरा मारावा लागला . यामुळे शेतकऱ्याचा नादच खुळा याचीच सर्वत्र चर्चा ऐकायला मिळत आहे . ढकांबे येथील प्रगतिशील शेतकरी गोपीनाथ बोडके यांची एकुलती एक उच्चशिक्षित कन्या वैष्णवी हिचा विवाह पिंपळगाव बहुला येथील शांताराम नागरे यांचा उच्चशिक्षित एकुलता एक मुलगा संकेत यांच्यासोबत नुकताच झाला . पिंपळगाव बहुलापासून बालाजी लॉन्स हे विवाहस्थळ अवघे पाच सात किलोमीटरवर आहे मोटारीने आले तर दहा मिनिटेही लागणार नाहीत . परंतु , एवढ्या अंतरासाठी सासऱ्यांनी जावयासाठी चक्क हेलिकॉप्टरच पाठवले . पिंपळगावपासून पाच कि.मी वरील हेलिपॅडवरून हे हेलिकॉप्टर नवरदेवाला घेऊन विवाहस्थळापासू काही अंतरावर लँड झाले . तेथून नवरदेवाला गाडीने विवाहस्थळी आणण्यात आले . पिंपळगाव बहुला ते विवाहस्थळ या अंतरापेक्षा किती तरी जास्त हे अंतर आहे . याचीच चर्चा सर्वत्र होती .