समाज कल्याण केंद्र’,पारशीवाडी, घाटकोपर, येथे १५ ते १७ वयोगटासाठी लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी : अँड अमोल मातेले

 

प्रतिनिधी : बाळू राऊत

घाटकोपर पश्चिम : दि, १४ मुंबईमध्ये १५ ते १७ वयोगटातील किशोरवयीन मुला-मुलींच्या लसीकरणाला गेल्या दहा दिवसापासून सुरुवात झाली असून आतापर्यंत फक्त बारा टक्के इतक्या कमी प्रमाणात लसीकरण झाल्याचे निदर्शनास आल्याबरोबर लगेच डॉ. महेंद्र खंदारे, वैद्यकीय अधिकारी, एन/ वॉर्ड, घाटकोपर (पूर्व) मुंबई ०७७ यांची भेट घेऊन निवेदन दिले व ‘समाज कल्याण केंद्र’,पारशीवाडी, घाटकोपर, मुंबई येथे तातडीने लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली,

त्यांनी ही मागणी मान्य करत सदर ठिकाणी लसीकरण केंद्र मंगळवार दिनांक १८ जानेवारी २०२२ नंतर सुरू करण्याचे आश्वासन दिले. असे अँड. अमोल मातेले यांनी सांगितले