प्रत्येक विधवा भगिनीच्या मागे मी खंबीरपणे उभा आहे—बच्चू कडू

0
181

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

दि.१५ आॅगस्ट रोजी नामदार बच्चू कडू यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या १५ लाभार्थीना प्रत्येकी २०००० रु.चे धनादेश वाटप करण्यात आले. यात तेरा स्त्रिया व दोन पुरुष लाभार्थी होते. दारिद्र्य रेषेखालील १८ ते ५९ वर्षे वयोगटातील कुटुंबातील कमावत्या स्त्री किंवा पुरुष यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना २०००० रू.ची तात्काळ मदत देण्याची ही योजना आहे.
माननीय पालक मंत्री म्हणाले की शासनातर्फे मिळणारी ही मदत अत्यंत तोकडी आहे.तरी ही यातील काही रक्कम मुलांच्या शिक्षणासाठी वापरावी.या सर्व विधवांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळवून देऊ विधवांच्या मुलांना शैक्षणिक दत्तक घेऊ.विधवांसाठी असणाऱ्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देऊ.दीन- दलित,दिव्यांग, महिला यांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी प्रसंगी मंत्रिपद पणास लावू या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी गजानन सुरंजे, तहसीलदार अशोक गित्ते, नायब तहसिलदार राजेश गुरव,हरीश गुरव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, प्रहार चे सुशील पुंडकर, निखिल गावंडे,कुलदीप वसू,अवि घायसुंदर,अनोक राहणे तुषार पाचकोर इ. यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच या कार्यक्रमाला येण्यापूर्वी मा. मंत्री बच्चुभाऊ कडू यांनी नेव्होरी येथील पुरात वाहून गेलेल्या रवी दयाराम वसू या युवकाच्या कुटुंबियांना तातडीने शासकीय मदत देणे विषयी प्रशासनाला आदेश देण्यात आले.यावेळी आभार प्रदर्शन दिलीप बोचे यांनी मानले.