शहरातील मुख्य रस्त्यावरील दारुची दुकाने तात्काळ हटवा ◆ ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी ◆ उत्पादन शुल्क विभाग अधिकाऱ्यांना दिले निवेदन

 

दख़ल न्यूज़ भारत:शंकर महाकाली
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपूर

चंद्रपूर : शहरात विविध ठिकाणी मुख्य रस्त्यावर दारुची दुकाने आहेत. या दारु दुकानांकडे स्वत:च्या पार्किंग व्यवस्था नाही. त्यामुळे शेकडो ग्राहक आपली वाहने रस्त्यावर ठेवतात. त्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. इथे दारु पिणारे नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करुन दारुचा नशेत झिंगलेले त्यामुळे बरेवाईट बोलत असतात याचा पादचाऱ्यांना व महिला व शाळकरी मुलींना सामना करावा लागत असून नाहक त्रास सहन करावा लात आहे. त्यामुळे ही शहराच्या मुख्य मार्गावर असलेली दारुचे दुकाने तात्काळ हटविण्यात यावी व कायदा सुव्यवस्था राखावा यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, जिल्हा उपाध्यक्ष त्यागी देठेकर, जिल्हा युवा अध्यक्ष अजय झलके, जिल्हा सल्लागार संतोष डांगे, अतुल भडके, विनोद मेश्राम यांच्या उपस्थितीत राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकारी यांना निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. वरील गंभीर बाबींची दखल घेऊन जिल्हा पोलीस प्रशासन, मनपा प्रशासन व वाहतूक शाखेने तात्काळ या दारु दुकानांचा बंदोबस्त करावा अन्यथा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने दारु दुकाने हटविसाठी शेकडो महिला नागरिकांची पोस्टकार्ड पत्रे राज्य उत्पादन शुल कार्यालयात पाठवून दारु दुकाने हटविण्यासाठी मोठे तिव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

शहरातील मुख्य रस्त्यावर आनंद वाईन शॉप, तुकूम येथील माडर्न वाईन शॉप, मंगेश बिअर बार, नागपूर रोड वरील मनोहर वाईन शॉप, व रस्त्यांवर देशी दारूच्या दुकानापासून मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. उत्पादन शुल्क विभाग, महापालिका, शहर पोलीस, वाहतूक विभाग, जिल्हा पोलीस प्रशासनाचे नागरिकांच्या गैरसोयीकडे दुर्लक्ष होत आहे.
वरील बाबी प्रशासनाने गांभीर्याने घेऊन या दारु दुकाना विरोधात उपाययोजना पाऊले उचलावीत अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेने केली आहे.