वैरागड येथील महसूल मंडळ कार्यालयात आधार केंद्र सुरू करा. – आरमोरी पंचायत समितीचे उपसभापती विनोद बावनकार यांची तहसीलदार यांना निवेदन.

 

प्रतिनिधी//प्रलय सहारे

वैरागड : – आरमोरी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत समल्या जाणाऱ्या महसूल मंडळ कार्यालयात आधार केंद्र सुरू करण्यात येण्याची मागणी आरमोरी पंचायत समितीचे उपसभापती विनोद बावनकार यांनी आरमोरी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केले आहे.

वैरागड गाव आरमोरी तालुक्यातील केंद्रबिंदू असून येथे ग्राम सचिवालय, महसूल मंडळ कार्यालय, शाळा-महाविद्यालये, मोठी बाजारपेठ तसेच पर्यटन युक्त गाव आहे. यामुळे वैरागड गावालगत असलेल्या परिसरातील अनेक गावातील नागरिक कार्यालयीन कामे करण्यासाठी वैरागड येथे यावे लागते. येथे आधार केंद्र नसल्यामुळे नागरिकांना जिल्हा किंव्हा तालुकास्तरावर जावे लागत आहे. सर्वसाधारण नागरिकांना सोयीचे होण्यासाठी वैरागड महसूल मंडळ कार्यालयात आधार केंद्र सुरू करण्यात यावी अशी मागणी आरमोरी पंचायत समितीचे उपसभापती विनोद दिवाकर बावनकार यांनी आरमोरी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.