धूरयूक्त सरपंच बहिनीला,”धूरमुक्त साठी,मकरसंक्रांतिच्या दिवसी सिलेंडर गॅस भावाकडून भेट. — प.स.उपसभापती रोशन ढोक यांचे सामाजिक दायित्व व सामाजिक कार्य अमुल्य असेच!..

 

उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक ९८९०९४०५०७

देश खुप प्रगती करतो आहे,ही भ्रामक कल्पना आजही,”दिव्यास्वप्नच असल्याचे वास्तव,सरपंच पदावर असलेल्या महिला भगिनीच्या गंभीर आर्थिक(दारिद्र्य)परिस्थिती वरुन लक्षात आल्यावाचून राहत नाही..

खऱ्या घटना अंतर्गत एका झोपडीत वास्तव्य करणाऱ्या सरपंच बहिणीची धूरयूक्त कहाणी चिमूर पंचायत समितीचे उपसभापती रोशन ढोक यांना कळताच त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी सिलिंडर गॅस त्या धूरयूक्त बहिणीला भेट देऊन तिला धूरमूक्त करण्यासचे सामाजिक दायित्व व सामाजिक कार्य पार पाडले.अशा त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चिमूर तालुक्यातील मौजा आंबोली हे गाव ५ हजार लोकसंख्येच्या घरातले.या गावात सौ.शालिनी दोहतरे राहतात.मौजा आंबोली येथील नागरिकांनी दारिद्र्यात जिवन जगणाऱ्या व गंभीर आर्थिक परिस्थितीत संसाराचा गाडा हाकणाऱ्या सौ.शालिनीताई दोहतरे यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून दिले आणि आंबोली येथील नागरिकांची सेवा करण्याची त्यांना संधी दिली.सुदैवाने सौ. शालिनीताई दोहतरे आजच्या स्थितीत मौजा आंबोली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर विराजमान आहेत.

तद्वतच त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने संसाराचा गाडा चालवताना रुपये जमा करणे व सिलिंडर गॅस घेणे सरपंच सौ.शालिनीताई दोहतरे यांना व त्यांच्या पतीला जमले नाही.यात लाजिरवाणी बाब वैगरे काही नाही.मात्र त्या सरपंच पदावर विराजमान असताना सिलिंडर गॅस घेवू शकल्या नाहीत यावरून त्या चारित्र्यवान व कर्तव्यदक्ष आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.अशा चारित्र्यवान सरपंच बहिणीला सिलिंडर गॅस भेट देऊन चिमूर पंचायत समितीचे उपसभापती रोशन ढोक यांनी अमुल्य कार्यातील दायित्व जपले,हेच तर त्यांचे खरे सामाजिक कार्य आहे.

परंतू भारत देशात आजही कोट्यवधी नागरिक गंभीर परिस्थितीत जिवन जगत असल्याचे भयावह चित्र सरपंच सौ.शालिनीताई दोहतरे यांचा हालाखीचा संसार सांगतो आहे.